मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांत, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे

संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.

या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.

श्री सुर्य संक्रमण:-

शके १९४० पौष शु ८ ला रोज रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे

मकर संक्रांत:-

मकर संक्रांती माहिती

प्रती वर्षाप्रमाणे या वर्षीची मकर संक्रात शके १९४० पौष शु ८ ला रोज रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे

पर्वकाळ पौष शु ९ ला दिनांक १५/०१/२०१९ मंगळवार सकाळी सुर्यदय ०७:१४ मी पासुन ते सुर्यास्त संध्याकाळी ०६:२० मी पर्यत आहे

संक्रांती फल:-

संक्रात वाहन सिंह उपवाहन हत्ती आहे.
पांढरे रंगाचे वस्ञ परिधान केले आहे.हातात भृशुंडी शस्त्र
घेतलेले आहे. कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे वयाने बाल आहे. वासाकरिता चाफ्याचे फुले घेतल आहे. देव जाति आहे. अन्न भक्षण करते आहे.
भुषणार्थ प्रवाळ रत्ने धारण केले आहे
वारनांव व नक्षञनांव ध्वाक्षी आहे. प्रवास दक्षिणे कडून
उत्तरेस जात आहे ईशान्य दिशेस पाहत आहे.

पुजा साहित्य:-
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.

संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

 

No comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *