आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. या दिवसात, माता भगवतीच्या नऊ रूपांची पूजा-अर्चना होते. चला तर मग जाणून घेऊया घट स्थापना कशी करावी

प्रथम घटस्थापना करण्या साठी लागणारे घटस्थापना पूजा साहित्य:

घट / टोपली, सप्त धान्य, काळी माती, पंचरंगी धागा, अत्तर, सुपारी, नारळ, वस्त्र, चुनरी, धूप, कपूर, अगरबत्ती, वाती, हवन सामग्री, समिधा, फूलोरा स्टॅंड

Puja Sahitya
  • प्रतिस्थापन नेहमी शुभ वेळी केले पाहिजे.
  • नित्यकर्म आणि स्नान केल्यानंतर ध्यान करा.
  • यानंतर, पूजास्थळापासून वेगळ्या जागेवर एक पाट ठेऊन त्यावर लाल वस्त्र / कापड ठेवा.
  • त्यावर अक्षतांचा वापर करुन अष्टदल बनवा आणि त्यावर पाणी भरलेला कलश ठेवा.
  • या कलाशामध्ये शतावरी, हळकुंड, कमल गट्टा, चांदीचे नाणे घाला आणि त्यावर नारळ ठेवा.
  • दिवा लावा आणि इष्ट देवाचे स्मरण करा.
  • मग देवी मंत्राचा जप करा.
  • आता टोपली / घटमध्ये काळी माती घेऊन त्यात सप्त धान्य पेरावे.
  • याला देवीचे स्वरूप समजून पूजा करावी.
  • शेवटच्या दिवशी पूजेचे विसर्जन करावे.

No comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *